वाढदिवसाला बुके नको बुक द्या – आमदार गणपत गायकवाड

(बालकृष्ण मोरे )

आठ विकास कामाचे केले उदघाटन

कल्याण / कल्याण पूर्व मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.आठ विकासा कामाचे उदघाटन करीत त्यांनी आपल्या कल्याण पूर्व मतदार संघाला विकास कामाचे गिफ्ट दिले तसेच येणाऱ्या चाहत्यांन कडून बुके न घेता “बुके नको बुक द्या” म्हणत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
त्या मुळे बुके न स्विकारता गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणा साठी वह्या घेत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.आपल्या वाढदिसाच्या सकाळी त्यांनी सर्वप्रथम जेष्ठ नागरिक कट्याला भेट देत केक कापून जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला.या नंतर त्यांनी वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या आरोग्य शिबिरास भेट देत येथे सुरू असलेल्या शिबिराची पाहणी केली.

या नंतर त्यांनी कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९० चिकणी पाडा येथे तिसाई हॉस्पिटल ते कृष्णा कॉम्प्लेक्स या सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्याच्या १५ लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन केले.दुसऱ्या कामाचे भूमीपूजन ९८ या प्रभागात केले. विजय नगर मुख्य रस्ता ते शुभम टॉवर हे १० लाख निधीच्या कामाचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले.तिसरे काम हे विजय नगर मुख्य रस्ता ते विशाल कॉम्प्लेक्स तीसगाव गावठाण पर्यत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. ५० लाख निधीतून हे काम करण्यात येणार आहे.चौथे भूमिपूजन हे चिंचपाडा ते करण अर्जुन चौक पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे असा होते. या कामचा निधी हा २५ लाख रुपये आहे.पाचवे काम चिंचपाडा कृष्णा कॉम्प्लेक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे हे काम २५ लाख निधीतून करण्यात येणार आहे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले .सहावे काम हे श्री मलंग रस्ता ते राम म्हात्रे यांच्या घरा पर्यत रस्ता काँक्रीटीकरण करणे हे असून या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला. हे कामा साठी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सातवे काम हे माणेरे वसार प्रभागातील वसार गावठाण ते मधील राम मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर होळी चौक रिक्षा स्टॅन्ड ते बाबू हश्या वायले यांच्या घरा पर्यत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करणे असून याचे देखील भूमिपूजन करण्यात आले.याचा निधी हा ५० लाख रुपये आहे.शेवटचे व आठवे काम मेट्रो मॉल परिसरातील नंदादीप नगर येथील मोठा नाला बनविणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याचा निधी हा २५ लाख मंजूर करण्यात आला आहे.
रात्री अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook