अनधिकृत बांधकामाना नांदिवली पाडाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्यास विरोध

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०७ – डोंबिवली जवळील २७ गावांना सध्या समाधानकारक पाणी पुरवठा होत आहे. मात्र नांदिवली पाडा येथे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अनधिकृत इमारतीना पाणी पुरवठा करण्याचे घाटत असून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता अधिकारी हे काम करत आहेत. हे तातडीने थांबवण्यात यावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. पी अॅड टी कॉलीनी, नांदिवली पंचानंद प्रभाग ११३ च्या शिवसेना नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी  पाणी पुरवठा  विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एक निवेदन देऊन अनधिकृत इमारतींना नांदिवली जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्यास ठाम विरोध केला असून अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या निवेदनात नगरसेविका प्रेमा म्हात्रे म्हणतात.

नांदिवली भागास सध्या पाणी पुरवठा ठीक होत असून नवीन सहा इंचाची जलवाहिनी याला जोडली. तर संपूर्ण परिसरातील पाणी पुरवठयावर  परिणाम होणार आहे. व या भागात तीव्र टंचाई निर्माण होण्याचा धोका आहे. सदर जलवाहिनी जोडण्यामागे काही अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचा हात असून या भागात अनेक अनधिकृत इमारती होत आहेत. त्यानी विकलेल्या सदनिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याना पुढे करुन अनधिकृत बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक आपले हित साध्य करण्यासाठी धडपड करत आहेत. या भागास पाणी पुरवठा करायचा असेल तर पाण्याचा कोटा वाढवून घेऊन स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करुन ध्यावी अशी सूचना त्यानी केली आहे. मी या भागाची लोकप्रितनिधी असून मला विश्वासात न घेता पाणी खात्याचे आधिाकरी मनमानी करत असून जर हे काम थांबले नाही. तर उपोषण करण्याचा इशारा त्यानी दिला आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook