बारवी धरणात मात्र २२ टक्के साठा

डोंबिवली दि.०७ – राज्यात अनेक भागात पाणी संकट ओढवलं असताना राज्यातील धरणांमध्ये अवघा ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र ठाणे जिल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात  सुमारे २२.८२ टक्के इतका पाणीसाठा असून १५ जुलैपर्यत हा पाणीसाठा पुरणार असल्याने पाणी कपातीची आणखी गरज पडण्याची शक्यता नाही. सध्या ठाणे जिल्यात आठवडयातून ३० तास पाणी कपात होत असून बारवी धरणात पुरेसा साठा असल्याने पाणी कपातीची गरज पडणार नाही असा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र जर पाऊस लांबला तर मोठी गंभीर स्थिती निर्माण होण्याची भिती आहे. बारवी धरणात आजच्या तारखेला पाणीसाठा ५३.१८ दलघमी पाणी असून सुमारे २२.८२ टक्के  पाणीसाठा आहे.

गेल्यावर्षी याच तारखेला बारवी धरणात ३५.३५ टक्के पाणीसाठा होता. बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असून यंदा धरणात पाणीसाठा शंभर टक्के  करण्याचा निर्धार औद्योगिक विभागाचे अधिकारी व्यक्त करत आहेत. सध्या धरणामध्ये २३४ दशलघ मीटर पाणीसाठा होत असून उंची वाढवल्यास हा साठा ३४०.४८ दशलघ मीटर इतका होणार असून पुढील २५ वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. यांसदर्भात बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांना विचारले असतात्यांनीही बारणी धरणातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असून सध्या असलेला पाणीसाठा १५ जुलै पर्यत पुरेल इतका असून आणखी पाणी कपात करण्याची गरज पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook