कल्याण डोंबिवली 9 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 23 जून रोजी मतदान

मुंबई दि.२५ – उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महानगरपालिकांमधील 15 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी २३ जूनला मतदान; तर २४ जून २०१९ रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे ३० मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत दाखल करता येतील.२ व ५ जून २०१९ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ जून २०१९ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १० जून २०१९ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ११ जून २०१९ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २३ मे २०१९ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २४ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग:

उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नवी मुंबई- 29,

कल्याण-डोंबिवली- 26, पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि 1अ,

कोल्हापूर- 28 आणि 55, नाशिक- 10ड,

मालेगाव- 6क,

परभणी- 11अ आणि 3ड

चंद्रपूर- 6ब आणि 13ब.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook