तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला डोंबिवलीतून अटक

(श्रीराम कांदु)

कल्याण क्राइम ब्रँच ने दि.14/05/2019 रोजी दुपारी 01 ते 02 वा. दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील रेकॉर्डवरील सराईत खतरनाक गुन्हेगार नामे शिवाजी किसन कालन वय 25 वर्षे रा.हेदुटणे गाव बदलापूर पाईप लाईन रोड मानपाडा डोंबिवली पूर्व यास मानपाडा पोलीस स्टेशन ने एक वर्षाकरिता तडीपार केलेले असताना तो आपल्या घरी आलेला आहे. अशी गुप्त बातमीदारां मार्फत बातमी कल्याण क्राईम ब्रँच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजू जॉन यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ चाणाक्ष पथक पोलीस उप निरीक्षक निलेश पाटील, पोलीस उप निरीक्षक नितीन मुदगुन,पोलीस हवालदार दत्ताराम भोसले,राजेंद्र खिलारे राजेंद्र घोलप,निवृत्ती थेरे आणि हरिश्चंद्र बंगारा यांनी आरोपी त्याचे घराला चारी बाजूने घेरावा केला असता.

हेही वाचा :- डोंबिवली ; कोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचा खोळंबा

आरोपी शिवाजी किसन कालन यास पोलिसांचा संशय येताच. तो आपल्या घराच्या मागील बाजूच्या खिडकीतून उडी मारून पोलिसांना चकवा देऊन त्याच्या राहते घराच्या मागे शेतजमीन व जंगलात पळत असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून करून पकडले. सदर आरोपी त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नागरिकांवर दहशत निर्माण करणे चाकू, तलवार वापरणे वार करणे धमकावणे. तसेच नागरिकांना लुटणे (रॉबरी) असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. तरी सदर आरोपी यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये कारवाई करून मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook