डोंबिवली ; धुसखोर चालकांच्या दादागिरीला पोलीसांचे अभय

[महिला रिक्षा चालकांमध्ये दहशत]

डोंबिवली दि.१४ :- राज्य शासनाने महिलांना रेाजगार मिळावा म्हणून माहिलांना रिक्षा परवाना दिला व गुलाबी रंगाची  रिक्षा व्यवसाय करण्यासाठी दिली. पण डोंबिवलीतील केळकर रोडवर रिक्षा चालक रांगेत उभे असताना काही घुसखोर रिक्षा चालक दादागिरी करुन मध्येच घुसतात, महिलां रिक्षा चालकांच्या रिक्षांचे टायरला खिळा मारुन पंक्चर करतात. यामुळे महिला चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यांसदंर्भात वाहतूक पोलीसांकडे तक्रार केली असता ते लक्ष देत नाहीत. उलट दादागिरी करणाऱ्या रिक्षा चालकांना अभय देतात. अशा तक्रारी करण्यात आल्या असून शिवसेनेच्या महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेने या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डोंबिवलीत गुलाबी रंगाची रिक्षा महिला चालवत असून त्या महिला रांगेत उभ्या असतात. तेव्हा त्याना स्टँडवर उभे राहू दिले जात नाही व रिक्षाला खिळा मारुन पंक्चर करत असल्याची तक्रार महिला रिक्षा चालकांनी सहाय्यक पोलीस आयुक्ताकडे लेखी केली आहे.

हेही वाचा :- तडीपार गुन्हेगाराला कल्याण क्राईम ब्राँच कडून अटक….

तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर यांनीही वांरवार सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक संतीश जाधव हे तक्रारीची दखल घेत नसल्याचे निदर्शनाला आणले आहे. घुसखोर रिक्षा चालकांना पोलीस निरीक्षक जाधव पाठीशी घालत असून घुसखोर रिक्षा चालकांवर कारवाई करत नाही असेही नमूद केले आहे. माझी कुठेही तक्रार करा, मला बदली हवी आहे असे उत्तर देतात. डोंबिवलीत प्रमाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकाना यामुळे त्रास होत आहे. पोलीस निरीक्षक जाधव जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून तातडीने लक्ष देण्याची विनंती त्यानी केली आहे. या संदर्भात वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश जाधव याना विचारले असता त्यानी आमची कारवाई सुरु आहे, रिक्षा चालकांचे आपसात वाद असून पोलीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत असल्याचे त्यानी सांगीतले. रिक्षा युनियन 10 रुपये जमा करतात त्यावरुन वाद असल्याचे त्यानी सागीतले व सर्व आरोप फेटाळून लावले.

 

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook