महात्मा बसवेश्वर शासकीय जयंती उत्साहात साजरी.

उरण दि.१० –  शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मागणी नुसार व शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शासकीय कार्यालये, नीम शासकीय कार्यालये, विविध शासकीय महामंडळे आदि ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येवु लागली. त्याच अनुषंगाने उरणमध्ये ही शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका अध्यक्ष बालाजी हेड्डे, उपाध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून लेखी निवेदने देउन जयंती साजरी करण्या बाबत विनंती केली होती त्याला शासकिय कर्मचा-यांनी योग्य प्रतिसाद दिला. उरण मध्ये सन 2015 पासून तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती आदि ठिकाणी शासकीय महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येवु लागली.

हेही वाचा :- नारायण राणे म्हणतात ‘नो होल्ड्स बार्ड…’

दरवर्षी प्रमाणे उरणमध्ये याहीवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उरण तहसील कार्यालयात मालती घरत- नायब तहसीलदार(संगायो)यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तर पंचायत समिती मध्ये नीलम गाडे- गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांच्या हस्ते तर उरण नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी- अवधूत तावडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. एकंदरीतच शासकीय महात्मा बस्वेश्वर जयंती उरण मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली.महाराष्ट्र शासनाच्या शासकीय परिपत्रका नुसार महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असल्याने  शिवा संघटनेचे उरण तालुका उपाध्यक्ष विट्ठल ममताबादे यांनी तहसील, पंचायत समिती, नगर परिषद आदि शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी वर्गांचे आभार मानले.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook