डोंबिवलीतील सांडपाण्यावर उगवणाऱ्या भाज्या खातात मुंबईकर… मनसे करणार पुन्हा आंदोलन…..

डोंबिवली दि.०८ – डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यातून निघणारे केमिकलचे सांडपाणी सीईटीमार्फत उघड्या नाल्यातून वाहत जाऊन पश्चिम डोंबिवलीच्या खाडीला जाऊन मिळते. मात्र हेच पाणी काही लोक खेचून घेऊन रेल्वेच्या ओसाड जमिनीवर पेरलेल्या पालेभाज्यांसाठी वापरत करत असल्याचा प्रकार सुरु आहे. या दुषित पाण्याचा वापर करून रेल्वेच्या जवळपास ८ एकर जमिनीवर विविध प्रकरच्या भाज्यांचे पिक घेऊन या भाज्या मुंबई परिसरात वितरीत करण्यात येत असतात. त्यामुळे दुषित पाण्यापासून तयार केलेल्या या भाज्या आरोग्यास कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तीन वर्षांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारचा पर्दापाश केला होता. त्यावेळी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर तीन पंप जप्त करण्यात आले होते. त्यानंतर काही महिने हा प्रकार बंद झाला होता. आता पुन्हा असा प्रकार सुरु झाल्याने मनसे पुन्हा आंदोलन करणार आहेत. ठाकुर्ली पश्चिमेकडील चोळेगाव पॉवर हाउस पट्टात सदर मोकळी जमीन आहे. गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेला विद्युत पुरवठा करणारे हे पॉवर हाउस बंद स्थितीत आहे.कोळश्या पासून वीज निर्मिती केली जात होती. त्यामुळे या जमिनीत मोठ्या प्रमाणात कोळसा मुरलेला असल्याने या भागाला कोळश्याची जमीन म्हणून ओळखली जाते. त्यातील ३ एकर जमीन चंद्रदेव वर्मा नामक इसम गेल्या १५-१६ वर्षापासून कसत आहे. सदर जमिनीवर मुळा ,चवळी व लाल माठ या पालेभाजीचे पिक घेतले जाते.

पावसाळ्या व्यतिरिक्त वर्षातून ८ महिने या जमिनीत पालेभाज्या सदर जमिनीत पिक घेतले जाते.या सर्व पिकांसाठी एमआयडीसी-ठाकुर्ली खाडी व्हाया चोळेगाव या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील पाण्याचा वापर तीन डीझेल पंपाद्वारे करण्यात येतो.छोट्या ट्रॅकटरद्वारे जमिनीत मशागत केली जाते. त्यासाठी सात –आठ मजूर रोजंदारीवर काम करत आहेत. यात काही महिलांचाही समावेश आहे.हे सर्व लोक उत्तर भारतीय असुन यांच्याकडे शेती करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समजते.पावसाळ्याच्या दिवसात कोळश्याच्या या जमिनीत भेंडीचे पिक घेतल्यास हि भेंडी लाल-पिवळसर होत असल्याने ती खाण्यायोग्य नसल्याचे तेथील काही मजुरांनी सांगितले होते. ही सर्व भाजी मुंबईतील घाटकोपर ते दादर दरम्यान विक्री करण्यासाठी भाजी विक्रेते येथून घेऊन जात असतात.मूल्याची गोणी ( कॅरी ) ५० ते ७० रुपये, लाल माठ आणि चवळीची भाजी ५ रुपये या प्रमाणे आम्ही विकत असल्याचे चंद्रदेव वर्मा यांनी सांगितले.तर या भागात एका ठिकाणी मुळा,लाल माठ आणि चवळी ही पालेभाजी धुण्याचा अड्डा आढळून आला. या ठिकाणी विहिरीचे पाणी उपसून तयार केलेल्या हौदातील पाण्यात सदर भाजी धुतली जाते अशी माहिती राजीव वाघरी यांनी दिली. तीन वर्षांपूर्वी मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, मनोज घरत , सागर जेधेयासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी पाहणी केल्यावर हा प्रकार उजेडात आला होता. संतप्त मनसैनिकांनी विष्णूनगर पोलीसांना माहिती दिल्यानंतर या ठिकाणचे तीन पंप जप्त केले होते. हा प्रकार कायमस्वरुपी बंद होईल असे वाटत होते. मात्र कायद्याचे भय नसलेल्यांनी पुन्हा अश्या प्रकारे पालेभाज्या पिकवत असल्याचे सुरु ठेवले आहे.मनसे पपुन्हा आंदोलन करणार असून यावेळचे आंदोलन हे अधिक तीर्व असेल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासन या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा…

सदर रेल्वेच्या जागेवर काही उत्तर भारतीय दुषित पाण्यावर पालेभाज्या पिकवत असल्याच्या प्रकार पुन्हा सुरु असल्यास मनसे सदर ठिकाणी आंदोलन करून बंद पडतील. रेल्वेचे कर्मचारी येथील उत्तर भारतीयांकडून भाडे घेत होते. याची माहितीही पोलिसांना दिली होती. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून रेल्वे प्रशासन कानाडोळा का करत आहे असा प्रश्न  मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook