बांग्लादेशच्या शिष्टमंडळाची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला भेट 

नवी दिल्ली, दि.०८ – बांग्लादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. गोहेर रिझवी यांच्या नेतृत्वाखालच्या एका शिष्टमंडळाने माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे आणि या मंत्रालयाच्या इतर अधिकाऱ्यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित चित्रपट निर्मिती संदर्भातल्या विविध पैलुंवर यावेळी झालेल्या बैठकीत भर देण्यात आला. प्रख्यात चित्रपट निर्माते शाम बेनेगल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून पटकथा लेखन अतुल तिवारी करणार आहेत. हे दोन्ही मान्यवरही या बैठकीला उपस्थित होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीच्या लॉजिस्टिककरिता संपूर्ण सहकार्याचे आश्वासन बांग्लादेशच्या शिष्टमंडळाने दिले. या चित्रपटासाठी संशोधन करण्यासाठी अतुल तिवारी बांग्लादेशला जाणार असून, बांग्लादेशमधल्या चित्रपट क्षेत्रातले मान्यवर पिपलू खान त्यांना सहाय्य करतील. बांग्लादेश मुक्ती लढ्यावर सहनिर्मित माहितीपटाबाबतही आज चर्चा झाली.

दूरदर्शनच्या डी डी फ्री डिशवर बांग्लादेश टेलिव्हिजनचे कार्यक्रम दाखविण्यात येतील त्याचबरोबर यासाठीचे कॅरेज शुल्कही माफ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लवकरच येणाऱ्या बांग्लादेश डीटीएचवर दूरदर्शन वाहिनीचे कार्यक्रम दिसतील असे बांग्लादेशच्या शिष्टमंडळाने सांगितले. ऑल इंडिया रेडिओ आणि बांग्लादेश बेटार यांच्यातल्या सहकार्याबाबत एका कराराला दोन्ही देशांनी मान्यता दिली असून येत्या जून पासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. दोन्ही देशात कम्युनिटी रेडिओचे मजबूत जाळ असल्याचे सांगून बांग्लादेशमधे यासंदर्भात प्रशिक्षणासाठी इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मास कम्युनिकेशनची सेवा भारतीय प्रतिनिधीमंडळाने देऊ केली.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook