पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कामकाजाचा रेल्वे प्रवाश्यांना त्रास…    

डोंबिवली दि.०२ – डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जुना पादचारी पूल मंगळवारपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला.त्यामुळे रेल्वेच्या नवीन मधल्या पुलाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाचे केले आहे. मात्र पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कामकाजामुळे रेल्वे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मधल्या पुलाच्या पूर्वेकडील स्टेशनबाहेर अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत रिक्षा थांबा असल्याने यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जुना पादचारी पूल मंगळवारपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार असून स्टेशनबाहेरील वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य तो बदल करावा असे पत्र दिले होते.

मात्र रेल्वे प्रशासनाच्या या पत्राला डोंबिवली वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे.तर अनधि फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फेल गेला आहे.रेल्वे प्रवाश्यांना होत असलेल्या त्रासाबाबत वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभर सुरु राहणार असल्याने वाहतूक व्यवस्थेबाबत योग्य नियोजनाची अपेक्षा असताना तसे न झाल्याने यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.तसेच लिस्टवापर वाढला असून यावरही लक्षठेवले पाहिजे अशी मागणी होत आहे.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook