डोंबिवलीत कॉफी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद 

डोंबिवली-  सर्वसामान्य नजरेला जे टिपता येत नाही ते कलाकारांना दिसतं त्यातूनच कला जन्माला येत असते असं नेहमीच म्हटले जाते. अशाच एका मनस्वी कलाकाराने कॉफी पेंटिंग या अतिशय अनोख्या कलाविष्काराचा ध्यास घेतला आहे. डोंबिवलीच्या बाल भवन येथे कॉफी हे माध्यम वापरून रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आले आहे.आज सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
डोंबिवलीच्या निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्र रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेंटिंग्ज कॅनव्हासवर उतरली. चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केल्यावर कलाप्रांतात आपले स्वतःचे असे विशिष्ट स्थान कसे निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल याची जाणीव झाली.असे त्यांनी सांगितले .प्रदर्शनात 50 चित्रे असून 20 चित्रे कॉफीने काढण्यात आली असून इतर चित्रे इन्क व इतर साधनांनी काढल्याचे त्या म्हणाल्या
लँड स्केप डिझाइन शिकत असताना रंग, रूप, आकार यांची ओळख झाली आणि हेच क्षेत्र आपल्यासाठी योग्य असल्याचे जाणवले. पण नेहेमीच्या तैलचित्र किंवा अकरॅलीक रंग वापरण्याऐवजी काहीतरी वेगळं माध्यम निवडावं असं मनात आलं. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता एक गती घेताना दिसत आहे. डोंबिवलीत पहिल्यांदा कॉफी पेंटिंग्जचं प्रदर्शन असून आतापर्यंत मुंबई, पुणे व अन्य शहरात मिळून १३ प्रदर्शनं झाली असून १०० पेक्षा अधिक कॉफी पेंटिंग्ज केली असल्याचे त्यांनी सांगितले प्रदर्शनाला चागला प्रतिसाद मिळत असून 18 ता प्रदर्शन आनंद बाल भवन इथे आहे .
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook