ऍनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

(श्रीराम कांदु)

ठाणे – ऍनिमिया आजारावर रोटरीने महिलांमध्ये जनजागृती करावी असे उद्दगार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी  जिल्हयातील रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3145 च्या वार्षिक परिषदेच्या कार्यक्रम प्रसंगी काढले.

यावेळी सभागृहाला मार्गदर्शन  करतांना त्यांनी असे सांगितले की, रोटरी संस्था राष्ट्र  निर्माणात सशक्त समजदार लोकांचा समूह बनविण्याचे काम करत आहे. रोटरी ही आज इंटरनॅशनल स्तरावर काम करीत आहे. या रोटरी संस्थेने अनेक आरोग्य विषयक सामाजिक कार्य केले आहे. जनतेने कोणत्याही संघटनेच्या माध्यामातून एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.रोटरीची कामे समाजाला प्रभावीत करणारी आहेत. संस्थेच्या मार्फत सामाजिक काम करतांना एक वेगळा प्रभाव पडतो. त्यांच्या कार्यामुळे विविध घटकांना आरोग्य विषयक विविध उपक्रमाची जाण निर्माण झाली आहे. एड्स बरोबर महिलांच्या काळजी घेण्यासाठी रोटरीने ऍनिमिया या गंभीर आजाराबाबत जनजागृती करतांना सकस आहाराचे महत्व विशद करणे आवश्यक आहे.

विकासाचे मूळ मनुष्य सेवा

           मनुष्य जीवन जगत असतांना  लोकांनी आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गुणांचा विचार करुन एकमेंकाना पुढे आण्यासाठी सत्कार्य करावे. जनतेने आपले काम करत असतांना एकमेकास सढळ हाताने मदत केली पाहिजे. सरकारला आपण आपले कर नियमित भरले तर सरकार ही आपल्या सोबत राहून  उपलब्ध झालेल्या करातून  आपणासं विविध सेवा पुरवू शकेल. सर्वांनी एकत्र येऊन नैसर्गिक पर्यावरणाबरोबर समाज मानवतेच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने शिक्षित  होण्यासोबत स्वस्थ आणि मानसिक वातावरण कसे चांगले होईल याकडेही लक्ष्य देणे आवश्यक आहे.  जनतेने काम करतांना सामजिक संस्थेचा प्रत्येकाला फायदा होतो.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते परंतू आज यशस्वी पुरुषाच्या बरोबर स्त्री आहे . चांगले काम करत आपले जीवन सुखी करा चांगल्या कामासाठी इतरांना प्रेरीत करा असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

          या कार्यक्रमास  खा. राजन विचारे,आ.संजय केळकर, रोटरीचे डिस्ट्रिक गर्व्हनर बी.एम.शिवराज, डिस्कॉन चेअरमन संदीप साळवी आदी  मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar