कल्याण डोंबिवली गुन्हे वृत्त

बंटी बबलीने ६ कोटी कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यासायिकाला घातला ३० लाखांना गंडा

दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

कल्याण :सांगली येथे राहणाऱ्या  एका दाम्पत्याने कल्याण ,मधील एका बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत तब्बल ३० लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे .या प्रकरणी सदर बांधकाम व्यवसायिकाने महात्मा फुले पोलीस स्थानकाट तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलीसनी अंकुश कदम व पूजा कदम या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरातील श्री साई श्रद्धा सोसायटी मध्ये राहणारे सचिन अडसूळ हे बांधकाम व्यासायीक असून त्यांचे रामबाग परिसरात अनिरुद्ध डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे .गत सप्टेंबर महिन्यात सांगली येथे राहणाऱ्या अंकुश कदम व पूजा कदम या दाम्पत्याने अडसूळ यांना सहा कोटी कर्ज मंजूर करून देतो असे आमिष दाखवले .तसेच यासाठी अंकुश ने आपले नाव बदलून आपण राकेश पाटील असल्याचे सांगत अडसूळ यांच्या कार्यालयात येवून त्याच्याकडून प्रोसेसिंग फी म्हणून ३० लाख रक्कम घेतली .मात्र पैसे देवून हि तीन महिन्यांचा कालावधी लोटला मात्र कर्ज मंजूर न झाल्याने अडसूळ यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्याने या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अंकुश कदम व पूजा कदम या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

=======================

भावाचे भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण

कल्याण : दोन भाऊ आपसात भांडत असताना एका रिक्षातून आलेल्या चार जणांमधील एका इसमाने मला शिवीगाळ का करतो असे सांगत वाद घालण्यास सुरुवात करत मोठ्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी भांडण सोडवण्यास गेलेल्या लहान भावाला या चार जणांनी बेदम मारहाण करत डोक्यात दगड घातला .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात हल्लेखोरा विरोधात तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

भांडूप येथे राहणारे संदीप कांदळगावकर हे रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास डोंबिवली सोनार पाडा येथे आपल्या लहान भावासह उभे होते या दोन्ही भावामध्ये छोट्या कारणाने वाद झाल्याने ते आपल्या भावाला शिवीगाळ करत होते यावेळी शेजारून जाणार्या एका रिक्षातून जाणाऱ्या चार जन आले त्यामधील एकाने आम्हाला शिवीगाळ का करतो असे विचारत त्याच्या शी वाद घालण्यास सुरुवात करत मारहाण करण्यास सुरुवात केली .यावेळी कांदळगावकर यांचा लहान भाऊ भांडण सोडवण्यास गेला असता त्याला हि मारहान करत दगडाने हल्ला केला .या हल्ल्यात लहान भाऊ जखमी झाला या प्रकरणी कांदळगावकर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल रकेली असून या तक्रारी नुसार चार अज्ञात इस्माविरोधात पोलीसनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook
Skip to toolbar