‘२.०’ ठरतीये बाहुबली
मुंबई दि.०६ – सुपरस्टार रजनीकांत, खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार, एली अवराम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच विविध विक्रम मोडीत काढत काही नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं पाहायला मिळालं. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण या घटकांवर लक्ष केंद्रीत करत त्याला चित्रपट रुपात साकारत दिग्दर्शक एस. शंकर यांनी ‘२.०’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. जवळपास तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता बॉक्स ऑफिसवर त्याच्याच कागिरीची वाहवा होऊ लागली.
हेही वाचा :- डोंबिवली पश्चिमेत तीव्र पाणी टंचाई नागरीकांची टँकरवर झुंबड
‘२.०’च्या हिंदी व्हर्जनशी जोडला गेलेला निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने माहिती देत आतापर्यंत या चित्रपटाने ५०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडल्याचं स्पष्ट केलं आहे. सोबतच धर्मा प्रॉडक्शन या चित्रपटाशी जोडलं गेल्याचा अभिमान वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाची अफलातून कमाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कमाईच्या बाबतीत ‘२.०’ बाहुबली ठरत आहे, असं म्हणणं वावगं ठरण नाही.
CREATING HISTORY! #2Point0 continues its stride as a mega blockbuster, collects 500cr worldwide!
@rajinikanth @akshaykumar @iamAmyJackson @shankarshanmugh @apoorvamehta18 @LycaProductions @DharmaMovies @divomovies pic.twitter.com/77vn1JzSQF— Karan Johar (@karanjohar) December 6, 2018