लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी राजस्थानातल्या 12 लोकसभा जागांसाठी मतदान
नवी दिल्ली, दि.०४ – राजस्थानमध्ये येत्या 6 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. गंगानगर, बिकानेर, चुरू, झुनझुनू, सिक्कर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवार, भरतपूर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागाऊर या 12 मतदार संघात मतदान होणार आहे.
हेही वाचा :- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी बिहारमधल्या 5 लोकसभा मतदार संघात मतदान
या टप्प्यात 134 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये 16 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 23,783 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Please follow and like us: