१०० सूर्य नमस्कारांनी लोकमान्य टिळक यांना आदरांजली

शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुण।

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शताब्दी पुण्यस्मरण उद्यापासून (१ ऑगस्ट २०१९) सुरू होत आहे. लोकमान्य टिळक यांच्या ९९ व्या पुण्यतिथी निमित्त डोंबिवलीच्या शैलेंद्र रिसबुड यांनी उद्या १०० सूर्य नमस्कार घालून लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहण्याचे ठरविले आहे. लोकमान्य टिळक यांनी मुंबईतील सरदार गृह येथे अखेरचा श्वास घेतला. त्या ठिकाणी हा उपक्रम व्हावा, अशी संकल्पना ‘केसरी’च्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांनी मांडली. त्यानुसार रिसबुड हे उद्या गुरुवारी (१ ऑगस्ट २०१९) हा उपक्रम करणार आहेत. सकाळी सव्वा नऊ वाजता सरदार गृहात लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रिसबुड सूर्य नमस्कार घालणार आहेत.

हेही वाचा :- डोंबिवलीतील ‘त्या’ चाळींवर कारवाई का नाही…?

लोकमान्य टिळक यांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रिसबुड यांनी लोकमान्यांना १,५०० सूर्य नमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच‘ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही रिसबुड यांनी ३०० सूर्य नमस्कारांचा उपक्रम सादर केला होता. एका दिवसात सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. या प्रमाणेच रिसबुड यांनी या आधी एकूण बारा वेळा सूर्य नमस्कारांचा हा उपक्रम केला असून उद्याचा तेरावा उपक्रम आहे.

हेही वाचा :- वाळू माफियांना पकडायला गेलेल्या पोलिसांनी चक्क पकडली वाळू वाहतूक करणारी 43 गाढवं..

या घटनेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रिसबुड यांनी लोकमान्यांना १,५०० सूर्य नमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही रिसबुड यांनी ३०० सूर्य नमस्कारांचा उपक्रम सादर केला होता. एका दिवसात सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. या प्रमाणेच रिसबुड यांनी या आधी एकूण बारा वेळा सूर्य नमस्कारांचा हा उपक्रम केला असून उद्याचा तेरावा उपक्रम आहे.

The Real Tiger Modi In Jungle, Men vs Wild show on 12th Aug
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email