सोनू निगम यांच्या जिवाला धोका :सुरक्षेत वाढ
काश्मीर येथे पकडलेल्या आरोपिंच्या चौकशितुन ख्यातनाम गायक सोनू निगम तसेच भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती समोर आली होती .गुप्तचर विभागाने याप्रकरणी पोलिसाना सतर्क केले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.सोनू निगमने सकाळी मशिदींच्या भोग्यांवरून देण्यात येणाऱ्या आझानविरूद्ध ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती.त्यावरून वाद निर्माण झाला होता व काही कट्टरपंथीयांनी त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. यातूनच सोनू निगमला लक्ष्य करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा संशय आहे.दरम्यान त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.