सावेडी नाक्यावर बिंगो व मटक्यावर छापा
नगर – मनमाड रोडवरील सावेडी नाक्यावरील एका अपार्टमेंटमधील राजदीप जनरल स्टोअरच्याखाली एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या बिंगो व मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान याप्रकरणी १९ जुगारी विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस जुगार ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.