महिला दिनानिमित्त मनसेतर्फे विविध कार्यक्रम संपन्न
डोंबिवली – जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सतत तीन दिवस यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्षा मंदताई पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पहिल्या दिवशी भजन स्पर्धा ,दुसा-या दिवशी आरोग्य शिबिर तर तिस-या दिवशी कर्तुत्ववान महिलांचा सत्कार व भजन स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षिस वितरण अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
पहिल्या दिवशी झालेल्या भजन स्पर्धेत सुमारे आठ भजनी गटांनी सहभाग घेतला.तर कॉंटयाक्ट केअर आय हॉस्पिटल व एस आर व्ही ममता हॉस्पिटल यांच्या सहभागातून आरोग्य शिबिर संपन्न झाले.तिस-या दिवशी भजन स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न झाला.मनसेच्या सरचिटणीस व उपाध्यक्षा शालिनीताई ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळा संपन्न झाला.यावेळी दीपाली काळे,सुवर्णा केळकर,डॉ.अर्चना पाटे,नीता पारकर,धनश्री साने,आरती मुनीश्वर,विद्या सूर्यवंशी,तेजल थोरवे,श्रुति शिंदे या कर्तुत्ववान महिलांचाही सत्कार करण्यात आला.या तीन दिवस सपन्न झालेल्या या विविध कार्यक्रमाना प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,तसेच मंदर हळबे,प्रकाश भोईर,राहुल कामत,सागर जेधे,मनोज घरत,राहुल गणफुले,सुदेश चुडनाईक,जिल्हाध्यक्षा दीपिका पेड़णेकर,उर्मिला तांबे,पूजा तावडे,नगरसेविका सरोज भोईर,ज्योति मराठे यांचीही उपस्थिती होती.मंदाताई पाटील,प्रतिभा पाटील,सुमेधा थत्ते,स्मिता भगणे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.