मशीन बिघडल्याने उमेदवारच कल्याण लोकसभेचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे मतदान दीड तास रखडले
डोंबिवली दि.२९ – कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र यावेळी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा फटका त्यांना बसला. बाबाजी पाटील हे सकाळी ८ वाजता खिडकाळी मतदान केंद्रावर आले होते. मात्र याचवेळी नेमकं त्यांचं मतदान असलेली ईव्हीएम मशीन बंद पडली आणि तब्बल दीड तास वाया गेला. त्यामुळे खुद्द उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दीड तास थांबण्याची वेळ आली. यादरम्यान मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सरतेशेवटी नवीन मशीन लावून मतदान पुन्हा सुरू झालं. या प्रकाराबद्दल बाबाजी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच मतदारांचा उत्साह पाहून विजयाचा विश्वासही व्यक्त केला.