पतंजलीच्या एजन्सी चे आमिष दाखवत ६५ हजारांना गंडा
डोंबिवली – ठाकुर्ली येथे पद्माकर कॉलनी टी एम टी इमारती मध्ये राहणारे दुर्गेश सिंह ६० यांना एका अज्ञात इसमाने त्याच्या मोबाईल वर फोन करत त्याला मी तुम्हाला पतंजली चे एजेन्सी घेवून देतो असे आमिष दाखवले तसेच या अज्ञात इसमाने त्यांच्याकडे ६५ हजारांची मागणी केली .या आमिषाला भुलून त्यांना या अज्ञात इसमाला ६५ हजार देवू केले मात्र बर्याच दिवसाचा कालावधी उलटूनही एज्नेसी बाबत काहीच हालचाल न झाल्याने सिंह यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात अज्ञात इस्माविरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .