डोंबिवलीत आधार रत्न पुरस्कार प्रदान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना डोंबिवलीत आधार रत्न पुरस्कार प्रदान
डोंबिवली 🙁 प्रतिनिधी )
धर्मराज फाउंडेशनच्या वतीने डोंबिवलीतील क्रीडा संकुल येथे आगरी-कोळी महोत्सवात आधार इंडिया या सरकारीसंस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा आधर रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री रविद्र चव्हाण, भाजप नगरसेवक तथा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष महेश पाटील , कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब , धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष जयेंद्र पाटील , समाजप्रबोधनकार अमित दुखंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर उद्देश उमप, हास्यसम्राट जॉनी रावत , उत्कृष्ठ निवेदक विवेक पोरजी , पत्रकार शंकर जाधव , आधार संस्थेचे मंदार आपटे यासह अनेक नामवंत व्यक्ती आणि मान्यवरांना आधर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अमित दुखंडे म्हणाले , सामाजिक कार्य करणाऱ्या अश्या या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्याची संधी संस्थेला मिळाली हे आमचे भाग्य आहे. या सत्कार सोहळ्यासाठी गुरुराज कुलकर्णी , बारिया , अर्चना खिल्लारे, किसन घोलप , मोहिनी दुखंडे , गणेश मोरे , करिश्मा दुखंडे , माईन यासह अनेकांनी अथक मेहनत घेतली.