डोंबिवलीतील बँकेने जप्त केलेल्या रिक्षांचे टायर व बॅटऱ्या चोरल्या
कल्याण : डोंबिवली
पुर्वेकडील सोनार पाडा परिसरात ललित काट्याजवळ सुरेश पाटील कंपाउंड मध्ये एकता को ऑप क्रेडिट सोसायटी या पत पेढीने कर्ज न भरलेल्या एकूण 12 रिक्षा जप्त करत ठेवल्या होत्या. रात्रीच्या सुमारास अद्न्यत चोरट्याने या रिक्षाच्या टायर सह बॅटरी लंपास केली. काल सदर बाब निदर्शनास आल्यांने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.