कल्याण डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.१० – डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली नेहरू रोड ललिता निवास येथे राहणारे राजन भिमपल्ली यांचे एम आय डी सी रोड वरील लक्ष्मण पाटील चाळीत कपड्याचे दुकाण आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करत घरी निघून गेले. दुकानाला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या दुकानाचे शटर उचकट्वून दुकानातील कपडे व मोबाईल असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला सकाळी दुकानात गेल्याबर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरी घटना डोंबिवली मध्ये उघडकीस आले. डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड अन्नपूर्णा भवन येथे रहणारी महिला शनिवारी संध्याकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून कुटुंबासह मुंबई येथे गेले होते घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्याच्या घराच्या किचन च्या खिडकीतून घरात घुसून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून एकून १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असुन या तक्रारी नुसार पोलीसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.