८० वर्षीय आजोबांना मेसोकार्डीया या दुर्मिळ हदयविकार आजारातून वाचविण्यात हिरानंदानी रूग्णालयाला यश

हदय उजव्या बाजूला सरकल्याचं तपासणीत आढळलं, नवी मुंबईतील पहिलीच घटना 

 

वाशी – आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरू असताना एका ८० वर्षीय वयोवृद्धाला अचानक छातीत तीव्र दुखू लागले. कोणतीही जोखीम न पत्करता त्यांना त्वरीत फोर्टीस हिरानंदानी हॉस्पीटल, वाशी मध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्वरीत तपासण्या करून त्यांना ट्रिपल वेसल डिसिज असल्याचे तपासणीत दिसून आले. त्यानंतर इको कार्डियोग्राफ (हदयाची स्थिती) तसेच (कोरोनरी अँन्जिओग्राफ) हदयाला रक्तपुरवठा करणा-या धमण्यांची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. तपासणी दरम्यान त्याचे हृदय उजव्या बाजूला सरकल्याचे समजले. ही एक अपवादात्मक बाब असून याला मेसोकार्डिया (छातीच्या मधोमध असणारे हृदय) असे देखील म्हटले जाते. ट्रिपल वेसल डिसिजमुळे त्यांची स्थिती अतिशय नाजूक होती. डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, इंटवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि डॉ. भास्कर सेमिथा, कार्डियाक सर्जन हिरानंदानी हॉस्पीटल, वाशी यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने त्वरीत कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) करण्याचे ठरविले.

मेसोकार्डिया असणार्‍या रूग्णाचे पहिल्यांदाच निदान झाले असून त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वी आपल्याला या स्थितीबद्दल कल्पना देखील नव्हती. कार्डियाक टीमने स्पष्ट केले की हदयाला रक्त पुरवठा करणा-या सर्व मुख्य रक्तवाहिन्या या अंशतः वा पूर्णतः बंद झाल्या होत्या. परिणामी रक्ताचा प्रवाह कमी झाला होता आणि काही ठिकाणी तर बंदच पडला होता. अशा अवस्थेत रूग्णाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. रूग्णाचे वय लक्षात घेता आणि त्यांच्या हृद्याची अवस्था लक्षात घेता हे वैद्यकीयदृष्ट्या एक आव्हानच होते. ऑपरेशन केल्यानंतर रूग्णाची बरी होण्याची शक्यता फारच अपवादात्मक होती, सर्जरी झाल्यानंतर रूग्णांकरिता असणार्‍या सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एसआयसीयु) –मल्टिस्पेशालिटी मेडीकल केअर सेंटरमध्ये त्यांना आणण्यात आले.

प्रक्रियेसंदर्भात डॉ. ब्रजेश कुमार कुंवर, इंटवेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, हिरानंदानी हॉस्पीटल, वाशी यांनी सांगितले, “८० वर्षांचे हे वृद्ध आमच्याकडे आले तेव्हा त्यांची अवस्था फारच वाईट होती. रूग्णालयाच्या बहु-आयामी टीमच्या सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. वेळेवर निदान झाल्यामुळे व त्वरीत उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या बाबतीतील आव्हान फार मोठे होते. चांगल्या रिकव्हरीमुळेच त्यांना अगदी २ दिवसात वॉर्डमध्ये हलविण्यात आले आणि ऑपरेशननंतर ७ दिवसातच घरी पाठविण्यात आले. रूग्ण आता व्यवस्थित असून नियमित तपासणीसाठी येत आहेत.”

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email