७० वर्षांनी विहिगाव मध्ये खणखणला फोन

खासदार विनय सहस्रबुद्धे  यांनी दत्तक घेतलेल्या विहिगाव मध्ये उभारली मोबाइल टॉवरची गुढी

ठाणे –  शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कसारा विभागातील विहिगाव या गावात व  14 आदिवासी पाड्यामध्ये स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदाच रविवारी फोन खणखणला. राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते भारत संचार निगम लिमिटेड (बी एस येन एल) तर्फे मोबाइल टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहापुरचे आमदार पांडुरंग बरोरा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते.  

शहापूर या आदिवासी तालुक्यातील पूर्णतः आदिवासी परिसर असलेल्या विहिगाव व 14 पाडे मिळून दीड हजारहून लोकसंख्या असलेले विहिगाव 5 जुलै 2016 साली  सहस्रबुद्धे यांनी आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे.  येथे मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने हे गाव जगापासून दूर कोपऱ्यात पडले होते. याची दखल घेऊन सहस्रबुद्धे यांनी भारत संचार निगम(BSNL) कडे पाठपुरावा करून विहिगाव येथे मोबाइल टॉवर उभा केला आहे.  यावेळी खासदार सहस्रबुद्धे यांनी विहिगाव मधूनच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना पहिला फोन करून गावकऱ्यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा व धन्यवाद दिले.

शासनाच्या विविध योजना, डीबीटीच्या योजना, मोबाइल बँकिंग,डिजिटल शाळा या मोबाइल टॉवरमुळे चालू होणार आहेत. या मोबाइल टॉवर मुळे विहिगाव व 14 आदिवासी पाड्यांमध्ये आत्ता मोबाइलची रिंग वाजणार आहे. हे गाव व पाड्यांमधील आदिवासी लोक जगाशी संपर्क करू लागले आहेत. 

यावेळी संसद आदर्श ग्राम प्रमुख सुजय पतकी, शहापूर पंचायत समितीचे गटनेते सुभाष हरड,  सहायक गटविकास अधिकारी सुशांत पाटील,विहिगावचे सरपंच दुर्वास निरगुडे, , जयश्री विष्णू कवठे,  भारत संचार निगमचे कल्याण जीएम हरिओम सोळंखी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email