५० लाखाची खंडणी मागणाऱ्या सुरेश पुजारी टोळीच्या चार खंडणीखोराना अटक
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीतील मॉर्डन केफे हॉटेलचा मालक अजित शेट्टी यांंच्या कडे पनास लाखाची खंडणी मागणाऱ्या सुरेश पुजारी टोळीच्या चार खंडणीखोराना खंडणी मागितल्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ताबा घेतला असून हरीश कोटियन ,अनिकेत ठाकूर,प्रथमेश कदम व संकेत दळवी चार खंडणीखोर आधारवाडी जेल मध्ये शिक्षा भोगत असल्याने या खंडणी प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौकशी साठी त्यांचा ताबा घेतला आहे .
हरीश कोटीयन हा डोंबिवलीतील हॉटेल मध्ये वेटरचे काम करीत होता वेटरच काम केल्याने तो अनेक हॉटेल व्यावसायिकांना ओळख असल्याने त्याने हॉटेल व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी देण्याचे सत्र सुरू केले त्याने आपल्या सहकारी संकेत दळवी,अनिकेत ठाकूर ,प्रथमेश कदम या तीन मित्राच्या मदतीने पन्नास लाखाची खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी कुप्रसिद्ध सुरेश पुजारी टोळीच्या या चौघांंचा रामनगर पोलिसांनी ताबा घेतला आहे.
Please follow and like us: