३० व ३१जानेवारी रोजी भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन

(श्रीराम कांदु)
डोंबिवली –आठवडा भरापूर्वी भारताची अंतराळीन संस्था इस्रोने गगन भरारी घेत 100 यशस्वी सॅटेलाईट प्रक्षेपण केले या अभिमानास्पद क्षणांचा मागोवा घेत डोंबिवलीमध्ये 30 व 31 जानेवारी रोजी भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील शाळांमधील सुमारे 20 हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असून, जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा विश्वविक्रम करत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे .
नासा, डावखर इंफास्टरक्चर प्रा ली, समर्थ पेट्रोलियम, स्पेस नॉट, रिजन्सी निर्माण ली, जागतिक विश्वविक्रम नोंद ठेवणारी संस्था या सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येत आहे. 30 व 31 जानेवारी रोजी डोंबिवली पुर्वेकडील कल्याण शीळ रोड विको नाका, गोळवली येथील रिजेन्सी निर्माण लिमिटेड येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अंतराळ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अंतराळ व खगोल शास्त्रामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष अंतराळ विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून सुमारे 20 हजार हुन अधिक विद्यार्थी पालकवर्ग या प्रदर्शनास उपस्थित राहणार आहेत .
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विश्व बद्दल तसेच अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दल इत्यंभूत माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार  आहे. नासा, रशिया, जपान, इएएसए व इस्रोद्वारे निर्मित दुर्मिळ असे जागतिक उपग्रह आणि रॉकेट यांच्या प्रतिकृती प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. शंभराव्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणचे औचित्य साधून एक दिवस विशेष इस्रो गॅलरी सदर प्रदर्शनात तयार करण्यात आली आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email