२७गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी लौकिक होम्स आदर्श माँडेल ठरेल – खा.डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली –  नियम मोडून बांधलेल्या इमारती या महापालिकेच्या  दुष्टीने अनधिकृत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे वीज- पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत.२७गावात देखील हिच परिस्थिती आहे. लौकिक होम्स, शेतकरी व जमीन मालक यांच्या कडून संयुक्त पणे गुहप्रकल्प साकारण्यात येत आहे.  २७गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी  लौकिक होम्स प्रकल्प आदर्श माँडेल ठरेल असा विश्वास खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज व्यक्त केला. 

या प्रकल्पाचा शुभारंभ भूमीपूजन खा.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.चेरा नगर, सागाव येथे हा प्रकल्प आकार घेणार आहे.या शुभारंभ प्रंसगी आ.सुभाष भोईर,रमेश पाटिल,पालिका सभागृह नेते राजेश मोरे, काँग्रेसचे संतोष केणे, प्रकल्प समन्वयक प्रकाश म्हात्रे, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, दिपाली पाटील, वाय शंकर, पोपट भंडारी ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.सदर प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर खा.शिंदे म्हणाले, बांधकाम व्यावसायिक शेतकरी व जमिन मालक एकत्र ऐउन हा प्रकल्प राबवित हि अभिमानाची बाब आहे. प्रकल्प दहा वर्ष रखडला हे चांगले झाले.चांगले असते ते भक्कम टिकाऊ असते.२७ गावात घरे पाहिजे. गरीबांना परवडणारी घरे हवीत.आपले घरांसाठीचे शासकीय धोरण भक्कम हवे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email