२६/ ११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली

 (श्रीराम कांदु)
२६/ ११ च्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना  डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलिस ठाण्यात  श्रद्धांजली वाहण्यात आली. विष्णुनगर पोलिस स्टेशनचे वपोनी  राजेन्द्र मुुणगेकर, ईगल बिग्रेडचे संस्थापक श्री विश्वनाथ बिवलकर , ज्येष्ठ  नागरिक डोंबिवली अध्यक्ष  अरुण हेड़ाव, चंद्रशेखर कर्वे, जितेंद्र आमोणकर, शंतनु सावंत, संजय गायकवाड़, अशोक हेगीष्टे, समीर कांबली यांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  यावेळी श्रद्धांजली वाहिली.  त्याप्रसंगी ईगल बिग्रेडचे संस्थापक श्री विश्वनाथ बिवलकर यांनी मोर्डन टेक्नोलॉजी बद्दल व जास्तीत जास्त तरुणांनी पोलिस खात्यात भरती व्हावे असे सांगून मार्गदर्शन केले.  ज्येष्ठ  नागरिक डोंबिवली अध्यक्ष   अरुण हेड़ाव यांनी  आपले मत व्यक्त केले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email