२५ जून रोजी झालेल्या मतदानात संजय मोरे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावल.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवार, २५ जून रोजी झालेल्या मतदानात शिवसेना उमेदवार संजय मोरे यांनी नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे, तर त्यांच्या पत्नी, नगरसेविका सुखदा संजय मोरे यांनी ठाणे महापालिका मुख्यालयातील मतदानकेंद्रात मतदानाचा हक्क बजावला. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही त्यांच्या पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका मुख्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावल.
Please follow and like us: