१५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
ठाणे दि.१३ – भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ बुधवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
ठाणे जिल्हा परिषद प्रांगणात सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
Please follow and like us: