११ मार्चला मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी

ठाणे –  जिल्हयातील होमगार्ड पथक / उपपथकामधील पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी 11 मार्च रोजी पोलीस कवायत मैदान, (मुख्यालय) ठाणे या ठिकाणी सकाळी 7वाजल्यापासून दुपारी 11वाजेपर्यत घेण्यात येणार आहे.

होमगार्ड नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे असतील.शिक्षण – कमीत कमी 10 वी उत्तीर्ण, वय – 20 ते 50 वर्षे, उंची – पुरुषाकरिता 162सें.मी. व महिलाकरिता 150 सें.मी., उमेदवार हा अनुशेषानुसार सदस्य नोंदणी ज्या तालुकानिहाय पथकातील आहे त्याच तालुक्यातील उमेदवारांनी सदर नोंदणीमध्ये सहभागी व्हावे, संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी दयावी लागेल.होमगार्ड ही एक मानसेवी संघटना आहे.

होमगार्ड स्वयंसेवक हे पूर्णवेळ शासकीय कर्मचारी नाहीत.  या संघटनेत सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची शासकीय नोकरी किंवा दैनंदिन रोजगार नाही. हे सदस्यत्व फक्त 3 वर्षांकरीता दिले जाते.  निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, स्वत:चा व्यवसाय असल्यास तसा दाखला व शेती असल्यास 7/12 उतारा जोडणे आवश्यक आहे.

बेरोजगार उमेदवारांना देखील सदस्य नोंदणी कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येईल. पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैदयकीय अधिका-यांचे शारिरीकदृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, 2 पासपोर्ट साईज फोटो, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशीलाच्या पुष्टयर्थ सर्व संबंधीत प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.  उमेदवारास नोंदणीचे वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास, त्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.

 उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यांत येईल. सदर नोंदणी कार्यक्रमाची तपशीलवार माहिती www.thaneruralpolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअशी माहिती जिल्हा समादेशक होमगार्ड तथा ,अपर पोलीस अधिक्षक, ठाणे प्रशांत कदम यांच्या कडून कळविण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email