११ मजली ईमारती वरून उडी मारून परदेशी नागरीकाची आत्महत्या

मुंबई – एका २५ वर्षीय परदेशी नागरीकाने कफ परेड मधील ११ मजली ईमारती वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई झोन १ च्या पोलिस उपायुक्तांनी या वृताला  दुजोरा देताना सांंगितले की, अजुन मृतदेहाची ओळख झालेली नाही. या प्रकरणाबाबत कफ परेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

कफ परेड पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक रश्मि जाधव यांना सकाळीच फोन आला होता की मेकर चेंबर्स ११व्या मजल्यावरून उडी मारून एका परदेशी नागरिकाने  आत्महत्या केली आहे. घटना स्थळावर पोहचल्या नंतर त्यांनी जेव्हा विचारपुस सुरू केली तेव्हा त्यांना माहिती मिळाली की या युवकाला रोमानियाच्या काँँसुलेट जनरल यांचा पत्ता पाहिजे होता. त्याने गूगल वर सर्च केले. तर त्याला  मेकर चेंबरचा पत्ता मिळाला. पण ज्यावेळी त्याला मेकर चेम्बरमधे आल्यावर अपेक्षित असलेले  काँँसुलेट जनरल कार्यालय मिळाले नाही. तेव्हा त्याने अनेकांकडे विचारणा केली परंतु त्याला बरोबर उत्तर न मिळाल्याने तणावात मध्ये येऊन ११ व्या मजल्याहुन उडी मारून त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email