हिललाईन पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड़
४ हजार ६०० लिटर वॉशसह ३० लिटर गावठी दारू नष्ट केली
उल्हासनगर – हिललाईन पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड़ टाकून पोलिसांनी ४ हजार ६०० लिटर वॉशसह ३० लिटर गावठी दारू नष्ट केली. तसेच हातभट्टीची सामग्री देखील जप्त केली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील वसारगावच्या शिवारात गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती व.पो.नि. घनश्याम पलंगे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून स.पो.नि. कौराती, पो.ह. जाधव, पो.कॉ. सुदिप भिंगारदिवे, जावळे, प्रदिप लोंढे यांनी मध्यरात्री २ च्या सुमारास सदर ठिकाणी धाड टाकली. तेथून २३ प्लास्टिकचे ड्रम, प्रत्येकी २०० लिटर नवसागर गुळमिश्रीत रसायन (वॉश) ४ हजार ६०० लिटरचा वॉश पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ३० लिटर गावठी दारूसह हातभट्टीची दारू बनविण्यासाठी लागणारी साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.याप्रकरणी पो.कॉ. लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याचा अधिक तपास पो. ह. चव्हाण करत आहेत.