हिंदू नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा सर्वत्र उत्साहात संपन्न

मुंबई -हिंदू नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा सर्वत्र उत्साहात संपन्न होतोय.यानिमित्त राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रम संपन्न झाले.डोंबिवली ,ठाणे यांसह मुंबई व उपनगरात नववर्ष स्वागत यात्रा संपन्न झाल्या तसेच पाr वेशभुषेत ढोलताशांच्या गजरात तरुणाई यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.विविध चित्ररथ,बाइक रॅली,लेझीम,ढोलताशा असं फारच मनमोहक वातावरण आज सर्वत्र दिसत होतं.

घरोघरी गुढ्या उभारून फारच पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा झाला. यानिमित्त  विविध ठिकाणी शोभायात्रा, बाईक रॅली काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आलं. गुढीपाडव्याच्या दिवशीची नववर्ष स्वागतयात्रा सर्वांसाठीच आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरते.. यंदाही मुंबई व उपनगरांमध्ये अनेक स्वागतयात्रा शाहरवासियांना पाहण्यास मिळाले. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते अशा पारंपारिक वेशभूषेतील शहरवासी तसेच भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईसह उपनगरात दिसत होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email