हा ‘आवाज’ चालेल!
विनोदी वार्षिक आणि खास ‘खिडकी चित्रां’साठी प्रसिद्ध असलेल्या ‘आवाज’चा यंदाचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. फटाक्यांचा किंवा डीजेचा कानठळ्या बसवणारा ‘आवाज’ नकोसा होत असला तरी हा ‘आवाज’मात्र दरवर्षी हवाहवासा वाटतो. दिवाळी अंकांच्या परंपरेत आणि ग्रंथालयात वाचकांच्या पसंतीतीतही ‘आवाज’ अग्रस्थानी आहे.
‘आवाज’चे संस्थापक-संपादक दिवंगत मधुकर पाटकर यांच्या पश्चात अंकाची जबाबदारी आता त्यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत.
यंदाच्या अंकात विकास सबनीस, ज्ञानेश बेडेकर, जयवंत काकडे, महेंद्र भावसार आणि अन्य व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे तर प्रभाकर वाईरकर, सुरेश सावंत, संजय मिस्त्री, विवेक मेहेत्रे, विजय पराडकर, प्रभाकर झळके आदींच्या हास्यचित्रमालिका, ज्ञानेश बेलेकर यांची खिडकी चित्रे आहेत.
डाॅ. यशवंत पाटील, मुकुंद टाकसाळे, संतोष पवार, मंगला गोडबोले, अवधूत परळकर, भा. ल. महाबळ, सुधीर सुखठणकर आणि अन्य मंडळींचे साहित्यही अंकात आहे.
‘आवाज’चे यंदा ६८ वे वर्ष असून अंकाची आता अमृतमहोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अमृतमहोत्सवी आणि त्यापुढील शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा.
हा ‘आवाज’ चालेल! विनोदी वार्षिक आणि खास ‘खिडकी चित्रां’साठी प्रसिद्ध असलेल्या ‘आवाज’चा यंदाचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. फटाक्यांचा किंवा डीजेचा कानठळ्या बसवणारा ‘आवाज’ नकोसा होत असला तरी हा ‘आवाज’मात्र दरवर्षी हवाहवासा वाटतो. दिवाळी अंकांच्या परंपरेत आणि ग्रंथालयात वाचकांच्या पसंतीतीतही ‘आवाज’ अग्रस्थानी आहे.
‘आवाज’चे संस्थापक-संपादक दिवंगत मधुकर पाटकर यांच्या पश्चात अंकाची जबाबदारी आता त्यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत. यंदाच्या अंकात विकास सबनीस, ज्ञानेश बेडेकर, जयवंत काकडे, महेंद्र भावसार आणि अन्य व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे तर प्रभाकर वाईरकर, सुरेश सावंत, संजय मिस्त्री, विवेक मेहेत्रे, विजय पराडकर, प्रभाकर झळके आदींच्या हास्यचित्रमालिका, ज्ञानेश बेलेकर यांची खिडकी चित्रे आहेत.
डाॅ. यशवंत पाटील, मुकुंद टाकसाळे, संतोष पवार, मंगला गोडबोले, अवधूत परळकर, भा. ल. महाबळ, सुधीर सुखठणकर आणि अन्य मंडळींचे साहित्यही अंकात आहे. ‘आवाज’चे यंदा ६८ वे वर्ष असून अंकाची आता अमृतमहोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अमृतमहोत्सवी आणि त्यापुढील शतकमहोत्सवासाठी शुभेच्छा.