हाय हिल्स सँडल्सने घेतला ६ महिन्याच्या बाळाचा बळी,कल्याण शहरातील घटना

हाय हिल्सच्या सँडलमुळे आईच्या हातून पडून ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू कल्याणमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली.कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.उल्हासनगरला राहणाऱ्या फैमिदा हमीद शेख या आपल्या मोहम्मद हमीद शेख या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन आलेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर घरी परतण्यासाठी येत होत्या. तेव्हाठ्यात दुस-या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली. आणि या दुर्घटनेत महिले जवळील असलेल्या ६ महिन्यांच्या चिमुरड्ला दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला.त्याला लगेच डॉटरकडे नेन्यात आले. पण हा आघात त्याला सहन झाला नाही त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकाराबाबत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. महिलांसाठी हाय हिल्स असणा-या  सँडल वापरने कितीही फॅशनेबल वाटत असलं तरीही त्याचा काळजीपुर्वक वापर करणं हे ही तितकच महत्वाचं आहे हेही लक्षात घ्यावे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email