हायप्रोफाईल’ सोसायटीतील सेक्स रॅकेटचापर्दाफाश
श्रीराम कांदु
ठाणे :- डोंबिवली पूर्वेकडील ‘हायप्रोफाईल’ समजल्या जाणाऱ्या आयरे रोड वरील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सेक्स रॉकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या अचानक पडलेल्या छापेमारीमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
छापेमारी दरम्यान २४ व २० वर्षीय दोन पिडीत तरुणीची सुटका करण्यात आली. तर महिला दलाला ताब्यात घेवून डोंबिवली पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जोसना परेश दोशी (५२) असे अटक महिला दलालाचे नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेकडील‘हायप्रोफाईल’ समजल्या जाणाऱ्या आयरे रोड वरील एका सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या दोन वर्षापासून हा अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती ठाणे ह्युमन ट्रेकिंग फोर्सचे अधिकारी रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी शुक्रवारी दुपारच्या सुमाराला बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलीस पथकातील सहय्यक पोलीस निरीक्षक सतीश वालगे, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, महिला कर्मचारी स्वरस्वती कांबळे, निशा कारंडे, तर पोलीस कर्मचारी राजू महाले, राजीव जोशी, यांनी सापळा रचून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला दलालजोसना परेश दोशी हिला अटक केली.
दरम्यान महिला दलाल जोसना ही प्रत्येक ग्राहकांकडून अडीज हजार रुपये घेवून पिडीत तरुणींची देहविक्रय करून त्यांना मोबदला म्हणून केवळ ५०० रुपये देत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अटक महिलेला उद्या कल्याण न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. तर पिडीत तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
Please follow and like us: