हात चालाखीने डेबिट कार्ड लंपास करत १९ हजारांना गंडा

कल्याण पुर्वेकडील मलंग रोड येथील एकविरा श्रावणी अपार्टमेंट मध्ये राहणारे ब्रिजलाल यादव ५५ हे एल आय सी एडवायझर आहेत.काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते याच परिसरातील एका एटीएम मध्ये गेले एटीएम मधील शिल्लक रक्कम कशी बघायची हे माहीत नसल्याने त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या एका अज्ञात इसमाला माहिती विचारली या इसमास यादवने आपला पासवर्ड सांगितला .या अज्ञात भामट्याला आयतीच संधी मिळाल्याने त्याने यादव यांचे लक्ष विचलित करत त्यांचे डेबिट कार्ड चोरले व त्या आधारे दुसऱ्या एटीएम मधून १९ हजार रुपये काढून घेतले .सदर बाब निदर्शनास येताच यादव यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: