हातचलाखिने दागिने लंपास
डोंबिवली – रायगड येथील कर्जत कळंब पोशीर येथे राहणारी महिला रविवारी दुपारच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ परिसरातील एका दुकानातून बहीनीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने विकत घेवून अत्रे रंग मंदिर येथून चालत जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवून असणा-या अज्ञात चोरट्याने हातचालाखीने त्यांच्या हातातील पिशवी चोरून पळ काढला .काही वेळाने त्यांना पिशवी चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: