हातगाडीला धड़क ; पोलीस टीएमटी चालकाच्या शोधत

ठाणे – टीएमटी बसच्या धडकेत हातगाड़ीचालक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली . सलमान शेख असे हातगाड़ीचालकाचे नाव असून त्याने २३ मार्च रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात टीएमटी चालाकाविरोधत गुन्हा दाखल केला. शेख हे त्यांच्या हातगाड़ीवरून कांदा-बटाटा पुरावाठयाचा व्यवसाय करतात.२० मार्चला वर्तकनगर परिसरातील घाऊक विक्रेत्याचा माल पोहोचावल्यावर सायंकाळी ते घरी परतत होते .तेव्हा सवाकरनगर रस्त्यावरील वळणावर भरधाव वेगाने आलेल्या टीएमटीची ठोकर हातगाडीला बसल्याने हातगाडीच्या फळया त्यांच्या पायात घुसून त्यांना दुखापत झाली.त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . दरम्यान फरार बस चालाकाचा शोध सुरु असून  याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.के .भोईर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.