हनुमान जयंती दरम्यान हवेत गोळी झाडली बंदूक परवानाधारकासह गोळी झाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान एका इसमाने हवेत गोळी झाडल्याची घटना घडली या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात बंदूक परवाना धारक विनोद पावशे सह गोळी झाडणारा आशिष मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच सदर बंदुक हि जप्त करण्यात आली आहे .
गत शनिवारी हनुमान जयंती निमित्त कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरु होती यावेळी विनोद पावशे यांचे नावे असलेल्या परवाना १२ बोआर च्या बंदुकीतून आशिष मिश्रा याने आकाशाच्या दिशेने हवेत गोळीबार केला .सदर घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी कोळसेवाडी पोलीसनी गोळी झाडणाऱ्या आशिष मिश्रा सह बंदूक परवाना धारक विनोद पावशे याने शस्त्र परवान्याचे अटी व शर्तीचा भंग करून त्यांचे स्वताचे नाव असलेल्या लायसन्स ची बंदूक बेकायदेशीर पणे दुसर्याला दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.