हर्षलचा मृतदेह 36 तासांनी सापडला
डोंबिवली दि.१२ – नांदीवली येथील नाल्यात 10 तारखेला रात्री लघु शंकेसाठी म्हणून गेलेला हर्षल रमेश जिमकल (24)वाहून गेला अथक 36 तास प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यावर आज सकाळी 9 च्या सुमारास आयरे येथील ज्योतिनगर येथे त्याचे शव मिळाले
हर्षल हा डिप्लोमा इंजिनियर शिकत होता रात्री 9 वाजता सोबत मित्राबरोबर होता व लघुशंका करण्यासाठी तो नाल्याजवळ उभा राहिला वत्याचा पाय घसरून तो नाल्यात पडला त्याच्या दोन मित्रानी आरडा ओरड केली व त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या वेळी जोरदार पाऊस होता व नाला तुडुंब भरला होता त्यात तो वाहून गेला त्याला शोधण्यासाठी अग्निष्मणदल ,पालिका कर्मचारी ठाण्याचे आपत्कालीन पथक अथक 36 तासंशोध घेत होते अखेर आज त्याचे शव मिळाले कल्याण येथील रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये शव चिकित्सा करून नातेवाईकांकडे सोपवण्यात आला व शिवमंदिर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याचे वडील रमेश टाटा कंपनीत असून बहीण भाऊ असा परिवार आहे गांधीनगर येथील जनरल वैद्य चौकात हे कुटुंब रहात आहे.