हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करुन लाखोंचे दागिने घेवून पसार झालेल्या दोन जणांना अटक
नवी मुम्बई – सोन्याच्या दुकानात घातक हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करुन लाखोंचे दागिने घेवून पसार झालेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबद्दल अधिक वृत्त असे कामोठे पोलीस ठाणे हद्दीतील न्यू बालाजी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात काही जण घातक हत्याराच्या मदतीने जबरी चोरी करून ६६ लाख रूपयांचे दागिने घेवून पसार झाले होते.खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या बातमीवरुन सदरप्रकरणी कारवाई करत शहनवाज अब्दुल जब्बार ,( २२ ) मदनसिंह जोहरसिंह खरवड,( २७) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.आतापर्यंत सदर गुन्ह्यांत १८.८५ लाख रूपयांचे ५९६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.या प्रकरणी पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पो.नि. शिरीष पवार करीत आहेत.
Please follow and like us: