स्वामी समर्थ जयंती उत्साहात संपन
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन



मंडळाच्या माध्यमातून साज-या केल्या जाणा-या उत्सवाचे हे ३४ वे षर्व असून त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पंचक्रोशीतून भक्त येतात. कै.सद्गुरु भालचंद्र(अण्णा) लिमये यांनी १९७४ मध्ये या मंडळाची स्थापना केली होती. तेव्हापासून रामनगर येथिल गणेश कृपा आणि त्यापाठोपाठ गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्ट या ठिकाणी स्वामी जयंति साजरी केली जाते. १९९९ पासून मंडळाने नांदीवली येथे एका मोठ्या जागेमध्ये स्वामींचा मठ बांधला, त्यामुळे परिसरालाही स्वामी समर्थ नगर असे नाव पडले.आता त्या मठाची ख्याती सातासमुद्रापार असून मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम केले जातात. मंडळाच्या संस्थापिक सुषमा लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली आता या मंडळाचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. 

या दोन दिवसांमध्ये भजन, किर्तन, संगीतसंध्या आदी उपक्रमांचेही आयोजन करण्यात येते.
याखेरीज शहरात पश्चिमेलाही कोपर रोड, संतोषी माता मंदिर नजीक स्वामींच्या मठामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तेथे देखिल अनेक भक्त आवर्जून दर्शनासाठी जातात. नीत्योपसना, मनोभावे सेवा करतात.
Please follow and like us: