स्वातंत्र्यानंतर खाडेवाडीत पहिल्यांदाच आली वीज

बीड – आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग एक खेडे बनले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक शोध लागले मात्र बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील खाडेवाडी या ८०० लोकवस्ती असलेल्या गावात अद्यापर्यंत वीजच पोहचली नव्हती. अशा या विकासापासून वंचित राहिलेल्या गावात सोमवारी विज आली अन् गावत दिवाळी साजरी झाली. वर्षानुवर्ष अंधारात चाचपडणाºया खाडेवाडी येथील नागरीकांना कधी नाही ते त्यांच्या घरात बल्प (वीज) लागलेला दिसला. यामुळे जेष्ठ नागरीकांच्या सुरकुतलेल्या चेहºयांवर विजेच्या प्रकाशा प्रमाणेच आनंद झळाळत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष पूर्ण होतायेत आत कुठे खाडेवाडीला वीज मिळाली आहे. आलेल्या विजेचे मोठ्या आनंदात गावकºयांनी स्वागत केले. सिंगल फेज रोहित्राला नारळ फोडण्यात आला. यावेळी येथील सरपंच रामचंद्र सानप, पिनु सानप, एकनाथ सानप, बालाजी खाडे, वैजिनाथ खाडे, कल्याण खाडे, किसन खाडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील सावरगाव ग्राम पंचायती अंतर्गत असलेल्या खाडेवाडी येथे स्वातंत्र्या पासून ते आता पर्यंत वीजच आली नसल्याचे येथील नागरीक व ग्रामपंचायत सदस्य राजू खाडे यांनी सांगितले. सोमवारी या गावात सिंगल फेज योजना कार्यान्वीत झाली. अख्खी हयात गेली मात्र रात्रीच्या वेळी गावात वीजेचा प्रकाशच न पाहिलेल्या ७० ते ८० वर्षाच्या जेष्ठ नागरीकांनी गावात लाईट आली असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. खाडेवाडी गावात इयत्ता ४ थी पर्यंतची शाळा आहे. मुलं रात्रीच्या वेळीचा अभ्यास दिव्याच्या प्रकाशात करायचे. गावात लाईटच नाही म्हटल्यावर विद्यार्थ्यांसमोर दुसरा पर्यायच नसायचा. याशिवाय गावात अद्याप पर्यंत पाणी पुरवठा करणारी कुठलीच योजना राबविलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात येण्यासाठी आजही रस्ता नाही. गतवर्षी रस्त्याला मंजूरी मिळाली आहे, परंतु प्रत्यक्षात अद्यापही काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यात तर अक्षरश: नागरीकांना गुडघाभर चिखलातून दोन किलोमिटर चालावे लागते. सावरगाव घाट येथे आल्यावरच वाहनांची व्यवस्था होते. अशा स्थितीत रहाणाºया गावकºयांना सोमवारी महावितरण विभागाने सिंगल फेज चे रोहित्र दिले. यामुळे आता यापुढे गावात विज रहाणार आहे.

दळण आणायला जावे लागायचे २ किलो मीटर 

गावात वीज नसल्याने पिठाची गिरणी नव्हती. दळण आणायचे असेल तर खाडेवाडी पासून दोन किलोमीटर असलेल्या सावरगाव घाट ला जावे लागायचे. एवढेच नाही तर मोबाईल चार्जिगसाठी देखील सावरगाव घाट येथे जावे लागायचे. मात्र आता सोमवार पासून गावात वीज आल्याने अनेक प्रश्न सुटणार असल्याचे येथील नागरीक म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email