स्वस्तात घराचे आमिष दाखवून दीड लाखाना गंडा
कल्याण दि.१४ – कल्याण पूर्व तिसगाव रोड चिकणी पाडा येथे दीपक निवास राहणारे भाऊ साहेब पाटील यांना कल्याण पुर्वेकडील विजय नगर परिसरात राहणाऱ्या आंबदास सोनवणे याने मी टिटवाळा येथे चाळी बांधत असून तिथे तुम्हला ३५० चौमीचे घर देतो असे आमिष दाखवून त्यांच्या कडून एक लाख ५५ हजार रुपये मागितले. `स्वस्तात घर मिळत असल्याने या आमिशाला बळी पडून पाटील यांनी सोनवणेला एक लाख ५५ हजार रुपये देऊ केले. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटला घराच ताबा देण्याबाबत सोनवणे काहीच बोलत नसल्याने अखेर पाटील यांनी आपले पैसे परत मागितले. यावेळी सोनवणे यांनी त्यानं उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने त्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .त्यांनी या प्रकरनि कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी आंबदास सोनवणे विरोधात गुन्हा दाखल करत त्याच शोध सुरू केला आहे.