स्वयंसहाय्यता गटांना नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना नुकतचं केंद्रीय ग्राम विकास, पंचायती राज आणि खाण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. वर्ष 2017-18 साठीचे हे पुरस्कार असून एकूण 34 स्वयंसहाय्यता गटांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महिला परिवर्तनाच्या दूत बनत असून ग्रामीण विकासात त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे कौतुकोद्गार तोमर यांनी व्यक्त केले. अभियानांतर्गत पुरवण्यात येणाऱ्या कर्ज सुविधेमुळे महिला परिवर्तनाच्या दूत ठरत आहेत. आतापर्यंत देशातील 5 कोटी महिला अभियानात सहभागी झाल्या असून 9 कोटी महिलांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे तोमर यांनी सांगितले.

अभियानातील सर्वोत्तम पद्धतींची आणि स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांची माहिती असणाऱ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही तोमर यांच्या हस्ते यावेळी झाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email