स्वच्छतागृहाच्या वादातून दोन भावांवर वार तर आईला केली मारहाण

डोंबिवली – स्वच्छता गृह बांधलेल्या जागेच्या वादातून दोन भावांवर वार तर त्यांच्या आईला देखील मारहाण केल्याची मारहाण केल्याची घटना कल्याण नजीक असलेल्या बडवली गावात घडली आहे .या हल्ल्यात आत्माराम पाटील त्यांचा भाऊ राजेश पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या आईला हि दुखापत झाली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी केशव पाटील .अविनाश पाटील ,लालचंद पाटील ,मनीष पाटील ,बबलू पाटील ,तर अलका पाटील या महिलेसह या कुटुंबातील काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

         कल्याण नजीक असलेल्या वडवली गावात रामचंद्र स्मृती निवास मध्ये राहणारे आत्माराम पाटील सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आपला भाऊ व आई सोबर घरासमोर उभे होते .आत्माराम पाटील यांनी घरा समोर स्वच्छता गृह बांधले होते .सदर जागा आमची आहे त्या ठिकणी स्वच्छता गृह का बांधले असा जाब केशव पाटील ,अविनाश पाटील ,लालचंद पाटील ,मनीष पाटील ,बबलू पाटील ,तर अलका पाटील या महिलेसह या कुटुंबातील काही जणांनि विचारला .त्यात त्यांचा जोरदार वाद सुरु झाला संतापलेल्या केशव पाटील याने आत्माराम पाटील व राजेश पाटील यांच्या डोक्यात धारदार शास्त्राने हल्ला केला .तसेच आत्माराम पाटील यांच्या घरातील  महिलांना ठोशा बुक्क्यांनी  मारहाण केली या हल्ल्यात आत्माराम पाटील व राजेश पाटील गंभीर जखमी झाले असून त्याच्या आईला हि दुखापत झाली आहे .या प्रकरणी आत्माराम पाटील यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी केशव पाटील ,अविनाश पाटील ,लालचंद पाटील ,मनीष पाटील ,बबलू पाटील ,तर अलका पाटील या महिलेसह या कुटुंबातील काही जणांवर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.